. माझा होशील ना !!! तु म्हणशील तस वागीन मी, फक्त हृदयात दे जागा थोडी... सतत त्रास देणारे केस मागे सारत, असाच हवासा त्रास तू देशील का... माझा होशील ना साथ देशील ना..... डोळ्यात डोळे घालून हातात हात देऊन, स्वतःच वचन मागत वचन देणारी... साथ आयुष्य भर देशील ना, न सांगता समजून तू घेशील ना, माझा होशील ना साथ देशील ना..... हृदय जरी माझं असल, तरी नाही एकत माझं, नाही होणार प्रेम परत मला... स्वप्नात पण नाही सोडू शकत तुला.... गाठ आयुष्याची बांधायची सोबत तुझ्या, तुझ्या मागे नाही सोबत चालायचंय... माझा होशील ना साथ देशील ना..... जपलेला प्रत्येक क्षण हा आयुष्याचा, सोबत तुझ्याच घालवलेल्या असावा... डोळे मिटताना पण शेवटचे, हातात हात तुझाच असावा.... माझा होशील ना साथ देशील ना.... -अक्षय कदम
Hindi Marathi Kavita, Sher o Shayri, Marathi Kavita, WhatsApp status etc.